

Marathi poetry reaches Mexico as Dr. Prithviraj Taur’s translations of Mexican poet Manuel Alejandro Ceballos’ works are published internationally.
Sakal
नवीन नांदेड : अभिजात भाषेचा बहुमान लाभलेल्या मराठी भाषेने आता जागतिक साहित्य क्षितिजावर आपली भक्कम पावले रोवली आहेत. ज्ञानभाषेकडे वाटचाल करत असताना अभिजात मराठी भाषा आपली पताका सातासमुद्रापार फडकवत आहे. एक पाऊल पुढे टाकत मराठी भाषेतील काव्यानुवाद थेट दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको मधून प्रकाशित झाले आहेत.