औरंगाबाद महापालिका सभापतींच्या दालनात खडाजंगी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 February 2018

औरंगाबाद - सिडको एन - दोन येथील कम्युनिटी सेंटरमधील खोली भाड्याने देण्याच्या कारणावरून नगरसेवक राज वानखेडे व उपायुक्त रवींद्र निकम यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार बुधवारी (ता. सात) दुपारी घडला. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर इतरांनी मध्यस्थी केली. मात्र प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले आहे. स्थायी समिती सभापतींच्या दालनात हा प्रकार घडला. 

सिडको एन - दोन मधील कम्युनिटी सेंटरची एक खोली रोज दोन तासांसाठी प्रति महिना एक हजार रुपये भाडे आकारुन देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र यापूर्वी अडीच हजार रुपये भाडे ठरल्याचे उपायुक्त रवींद्र निकम यांचे म्हणणे आहे. दरम्यान बुधवारी स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात याबाबत श्री. वानखेडे यांनी श्री. निकम यांच्याकडे विचारणा केली. स्थायी समितीने दर निश्‍चित केल्यानंतर तुम्हा खोडा का घालता? अशा जाब त्यांनी विचारला. त्यावरुन दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकांच्या अंगावर दोघे धावून गेल्याने सभापतींसह इतरांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यासाठी दोघांनी सिटीचौक पोलिस ठाणे गाठले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathwada aurangabad municipal corporation fight