जागरण गोंधळ घालून मराठवाड्यात राष्ट्रवादीचा हल्लाबोल

दीपक क्षीरसागर
मंगळवार, 16 जानेवारी 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सकाळी 9.30 वाजता तुळजाभवानी मंदिरासमोर सरकारच्या विरोधात देवीचा जागरण गोंधळ करण्यात आला. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून त्यानंतर सभा होणार आहे. त्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.

तुळजापूर – सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला आज सकाळी तुळजापूरमधून सुरूवात झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सकाळी 9.30 वाजता तुळजाभवानी मंदिरासमोर सरकारच्या विरोधात देवीचा जागरण गोंधळ करण्यात आला. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून त्यानंतर सभा होणार आहे. त्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. सायंकाळी ४ वाजता उमरगा येथेही जाहीर सभा होणार आहे. मराठवाड्यात 8 जिल्ह्यात 27 तालुक्यात जवळपास 1800 किलोमीटरचा प्रवास होणार असून 10 दिवसात 27 जाहीर सभा, मोर्चे, भेटी असा कार्यक्रम आहे.

सकाळी या हल्लाबोल यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार राणा जगजितसिंग आदींसह मराठवाडयातील सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.

Web Title: Marathi news Osmanabad news NCP hallabol morcha