esakal | Marathwada: पावसामुळे शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्या
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्या

केज : पावसामुळे शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केज : एका खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळेतील दोन वर्गखोल्या संततधार पावसामुळे कोसळल्याची घटना शुक्रवार (ता.१) रोजी रात्री साळेगाव येथे घडली. सुदैवाने सध्या शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र नुकताच राज्य शासनाने चार ऑक्टोबर रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींत विद्यार्थी अध्यापनाचे धडे गिरवणार काय? असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे.

तालुक्यातील आडस येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या आडस येथील वसतिगृहाची इमारतीची भिंत दोन-तीन दिवसांपूर्वी पावसाने पडली आहे. त्यातच शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे भिंत खचून साळेगाव येथील शंकर विद्यालयाच्या दोन वर्ग खोल्या कोसळल्या आहेत. मात्र सध्या कोरोना परिस्थितीत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असल्याने शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

loading image
go to top