esakal | Corona Updates: मराठवाड्यात नवे कोरोनाचे ४३ रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे ४३ रुग्ण

मराठवाड्यात नवे कोरोनाचे ४३ रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात बुधवारी (ता. १३) कोरोनाचे ४३ रुग्ण आढळले. त्यात बीडमध्ये १६, औरंगाबाद १५, लातूर ५, नांदेड ३, जालना-परभणीत प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. हिंगोलीत आजही नवा रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान औरंगाबाद-बीडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

नांदेडला तीन रुग्ण

नांदेड जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले. सध्या २० जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णसंख्या ९० हजार ३४८ असून ८७ हजार ६७६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत दोन हजार ६५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

परभणीत दोन बाधित

परभणी जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले. सध्या २८ जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या ५१ हजार ३१५ असून ४९ हजार ९९६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार २९१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात आजही नवा रुग्ण आढळला नाही. सध्या चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या १६ हजार ४२ असून १५ हजार ६४४ रुग्ण बरे झाले आहेत. ३९४ जणांचा मृत्यू झाला आहे.

लातुरमध्ये नवे पाच रुग्ण

लातूर जिल्ह्यात मंगळवारी (ता. १२) कोरोनाचे नवे पाच रुग्ण समोर आले. रुग्णांची संख्या ९२ हजार ४६३ वर पोचली. उपचारानंतर ८९ हजार ९८० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ४३ जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत दोन हजार ४४० जणांचा मृत्यू झाला आहे.

जालन्यात दोन बाधित

जालना जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ६१ हजार ८५३ असून ६० हजार ६२६ रुग्ण बरे झाले आहेत. ३३ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार १९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

loading image
go to top