esakal | Corona Updates: चिंताजनक! मराठवाड्यात कोरोनाचे २४ तासांत सात हजार रुग्ण

बोलून बातमी शोधा

Marathwada Covid 19 updates
Corona Updates: चिंताजनक! मराठवाड्यात कोरोनाचे २४ तासांत सात हजार रुग्ण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात शुक्रवारी (ता. ३०) दिवसभरात सात हजार १९७ कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येत बीड १५२०, औरंगाबाद १२६६, लातूर ९५८, परभणी ९२८, उस्मानाबाद ९००, जालना ६८३, नांदेड ६६५, हिंगोली २७७ या रुग्णांचा समावेश आहे. उपचारादरम्यान १५५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातूरमध्ये ३०, औरंगाबाद २८, बीड २५, नांदेड २१, उस्मानाबाद १९, परभणी १७, जालना १०, हिंगोलीतील पाच जणांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज २८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सिल्लोड येथील महिला (वय ४५), गंगापूर येथील महिला (५८), वैजापूर येथील पुरुष (५८), हिदायतनगर, वाळूज येथील पुरुष (४५), वैजापूर येथील महिला (३५), जमनवाडी (ता. वैजापूर) येथील महिला (७५), कन्नड येथील महिला (९०), इंदेगाव (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (५२), सिल्लोड येथील महिला (७५), फर्दापूर ठाणा येथील पुरुष (२५), सिल्लोड येथील पुरुष (५२), वैजापूर येथील महिला (७०), गारखेडा परिसर येथील महिला (७०), पिंपळगाव (जि. औरंगाबाद) येथील महिलेचा (५५) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य मृत्यू इतर रुग्णालयांतील आहेत.

हेही वाचा: महापालिकेचा फार्मासिस्ट निलंबित, रेमडेसिविर इंजेक्शन चोरी प्रकरण

औरंगाबादेत मृतांची संख्या अडीच हजारांवर

औरंगाबादेत १ हजार २६६ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णसंख्या १ लाख २४ हजार २०७ झाली आहे. बरे झालेल्या आणखी १ हजार १७६ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत १ लाख ९ हजार ७०० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एकूण ११ हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील मृतांची संख्‍या २ हजार ५१२ वर पोचली आहे.