esakal | Marathwada: पाथरीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेचा मृत्यू

पाथरीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथरी : एका २२ वर्षीय विवाहितेस कार घेण्यासाठी माहेरहुन ५ लाख रुपये आण असे म्हणत छळ केल्याचा आरोप करत विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू झाल्या म्हणून माहेरच्या मंडळीने दिलेल्या तक्रारीवरून सासर च्या तीन जणांविरुद्ध ३० सप्टेंबर रोजी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पाथरी पोलीस ठाण्यात आसफिया बेगम निसार अहेमद रा .पोहनेर यांनी ३० सप्टेबर रोजी फिर्याद दिली आहे की आरोपी सोहेल रफियोदीन फारुकी, रफियोदीन यकीन फारुकी व अंजुम रफियोदिन फारुकी सर्व रा. जैतापुर मोहल्ला पाथरी यांनी निदा फारुकी या २९ सप्टेंबर रोजी मयत झालेल्या विवाहीतेस मृत्युपूर्वी संगनमत करून माहेरवरून कार घेण्यासाठी ५ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून छळवणूक करून तिला त्रास देऊन क्रूर वागवणूक दिली. सदर विवाहिता संशयितरित्या मरण पावली असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे

loading image
go to top