Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर

₹52,000 Crore Marathwada Package Faces Slow Implementation : मराठवाड्याच्या विकासासाठी २०२३ मध्ये जाहीर केलेल्या ५२ हजार कोटींच्या पॅकेजपैकी १६ सप्टेंबर २०२६पर्यंत १२,२३६ कोटी ५५ लाख रुपये प्राप्त झाले असून ११,७२० कोटी ७५ लाख रुपये खर्च झाले आहेत.
Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर
Updated on

सुषेन जाधव

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला दुष्काळचक्रातून कायमचे बाहेर काढण्यासह मराठवाड्यातील पाणी, रस्ते, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आदी पायाभूत सुविधांसह विविध विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते; परंतु, तीन वर्षांनंतरही हे पॅकेज फसवेच निघाले आहे. ५२ हजार कोटींच्या मंजूर निधीपैकी १६ सप्टेंबर २०२६ अखेर केवळ १२, २३६ कोटी ५५ लाख निधी प्राप्त झाला असून, त्यातील ११, ७२० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी खर्च झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com