esakal | मराठवाडा एक्सप्रेस गुरुवारपासून नियमित धावणार 
sakal

बोलून बातमी शोधा

dow

सर्वांची मागणी असलेल्या मराठवाडा एक्सप्रेस सुरू करण्यास दक्षिण मध्य रेल्वे विभागाने मान्यता दिली असून (ता.२४) गुरुवारपासून ही रेल्वे नियमित वेळेत धावणार आहे. तसेच नांदेड-बेंगलोर-नांदेड उत्सव विशेष रेल्वेस एक फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या रेल्वेच्या वेळेत २५ डिसेंबरपासून बदला करण्यात आला तसेच गाडीचा यशवंतपूर येथील थांबा २५ डिसेंबरपासून रद्द करण्यात आला.  

मराठवाडा एक्सप्रेस गुरुवारपासून नियमित धावणार 

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

परभणी ः सर्वांची मागणी असलेल्या मराठवाडा एक्सप्रेस सुरू करण्यास दक्षिण मध्य रेल्वे विभागाने मान्यता दिली असून (ता.२४) गुरुवारपासून ही रेल्वे नियमित वेळेत धावणार आहे. मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने ही रेल्वे सुरू करण्यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. आज दक्षिण मध्य रेल्वे विभागाने एक प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली. 


सदरिल रेल्वे (ता.२४) पासून ७६८८ धर्माबाद येथून सकाळी चार वाजता निघून ही रेल्वे परभणी येथे सकाळी ६.४० वाजता येईल, औरंगाबाद येथे सकाळी १० वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात त्याच दिवशी ही रेल्वे दुपारी तीन वाजता निघून औरंगाबाद येथे सायंकाळी सहा वाजता व परभणीला रात्री ८.४५ वाजता येईल. 

हेही वाचा - परभणी ः शेतकऱ्यांच्या डोक्यात कॉग्रेसने भ्रम निर्माण केला ः माजी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप

मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पाठपुराव्यास यश  
ही रेल्वे सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंढे, रितेश जैन, डॉ.राजगोपाल कालानी, ओंकारसिंग ठाकूर, राजू माने, सतीश टाकळकर यांनी आभार व्यक्त केले आहे.  

हेही वाचा - ‘येळकोट येळकोट, जय मल्हारी मार्तंड’चा घरोघरी जयघोष 

बेंगलोर उत्सव विशेष रेल्वेच्या वेळेत शुक्रवारपासून बदल 
रेल्वे संख्या ०६५१९, ०६५२० नांदेड-बेंगलोर-नांदेड उत्सव विशेष रेल्वेस एक फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या रेल्वेच्या वेळेत २५ डिसेंबरपासून बदला करण्यात आला तसेच गाडीचा यशवंतपूर येथील थांबा २५ डिसेंबरपासून रद्द करण्यात आला आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. ही रेल्वे २५ डिसेंबरपासून बेंगलोर ते हुजूर साहिब बंगळूर रेल्वे स्थानकावरून रात्री २२.५० वाजता सुटेल. धर्मावरम ०३.४५, गुंटकळ ०६.०० , रायचूर ०८.०५, विकाराबाद १३.००, परळी -१८.४०, परभणी २०.३० आणि नांदेड येथे २२.५० वाजता पोहोचेल. ही रेल्वे यशवंतपूर येथे थांबणार नाही. रेल्वे संख्या ०६५२० हुजूर साहिब नांदेड ते बेंगलोर उत्सव विशेष रेल्वे २५ डिसेंबरपासून हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी ०६.३० वाजता सुटेल. पूर्णा ०७.०५, परभणी ०७.४०, गंगाखेड ०८.१०, परळी ०९.२०, विकाराबाद १४.००, रायचूर १९.१२, गुंटकळ-२१.१५, धर्मावरम ००.३० मार्गे बंगळूर येथे सकाळी ०४.५० वाजता पोहोचेल. ही रेल्वे यशवंतपूर येथे थांबणार नाही. 

संपादन ः राजन मंगरुळकर