
छत्रपती संभाजीनगर : सुमारे पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मराठवाड्याच्या काही भागांत बुधवारी (ता. सहा) फेरफटका मारल्यासारखी हजेरी लावली. या पावसामुळे खरिपातील पिकांना काहीसा आधार मिळाला असला तरी सर्वदूर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सकाळी आठच्या सुमारास आणि सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.