
CM Devendra Fadnavis
sakal
लातूर : मराठवाड्याला गेल्या दोन महिन्यांपासून अतिवृष्टीचा फटका बसत आहे. त्यात सप्टेंबरमध्ये होत असलेल्या ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे तर खरिपाचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर वाहून जाताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच विरोधी पक्षातील नेत्यांचे आपत्ती ‘टुरिझम’ झाले आहे.