
Marathwada floods
esakal
मुसळधार पाऊस, ओव्हरफ्लो धरणं आणि पूर... कधी नव्हे इतका पाऊस मराठवाड्यात पडला. शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक या पावसाने गिळून टाकलं. थोडाफार पूर ओसरल्यानंतर आता पिकांचं झालेलं नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या डोळ्यांसमोर वर्षभराचं स्वप्न धुळीस मिळालं. सरकारने दिलेली मदत पहिल्या टप्प्यातील पावसासाठी आहे, त्यामुळे यातही तांत्रिक अडचणी आहेत. आता नुकसानीला सामोरं गेलेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे.