Marathwada Flood
Sakal
मराठवाडा
Marathwada Flood : शासनाने शेतकऱ्यांना वार्यावर सोडुन नये : माजी खा. राजु शेट्टी
Raju Shetti : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीसाठी सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी; तसेच उसाच्या दरात होणारी १५ रुपयांची कपात थांबवावी, अन्यथा मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
दिलीप दखणे
वडिगोद्री : मराठवाडा सह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अतिवृष्टीने शेतातील पीकांचे नुकसान झाले, नदी नाल्यांना पुर आल्याने पीकांचे, पशुधनाचे,अन्न धांन्याचे नुकसान झाले, अतिवृष्टी मुळे शेतकरी संकटात आहे शासनाने त्वरित कर्जमाफी करून मदत करावी,शासनाने शेतकऱ्यांना वार्यावर सोडू नये असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा.राजु शेट्टी यांनी सांगितले.