
Marathwada Floods
sakal
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवानंतर मुसळधार कोसळणारा पाऊस नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेलाही ‘घटी’ बसल्याचे चित्र मराठवाड्याच्या काही भागांत दिसले. रविवारी (ता. २१) रात्री उशिरा झालेला मुसळधार पाऊस, धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे अनेक नद्या कोपल्या असून काही गावांना पाण्याचा वेढा पडला. बचाव पथकांनी पुरात अडकलेल्या अनेकांना सुरक्षितस्थळी हलविले. सोमवारीही काही भागांत पाऊस कोसळला. ढगाळ वातावरण कायम होते.