

Marathwada Heavy Rain
sakal
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाचे थैमान सुरूच असून, मंगळवारी (ता. २८) रात्री झालेल्या मुसळधारेने लातूर जिल्ह्यात झोडपून काढले. या जिल्ह्यातील सुमारे ३०, बीडच्या १३, जालन्यातील सात, तर परभणी दोन, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. काही नद्यांना पूर आला, तर काही धरणांतून पाण्याचा पुन्हा विसर्ग करावा लागला. यापूर्वीच्या अतिवृष्टीत उरल्यासुरल्या पिकांना या पावसाचा फटका बसला.