

Marathwada Rainfall
sakal
धाराशिव : मराठवाड्यात सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या पावसाची हजेरी अजूनही सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात (मराठवाडा) जून ते ऑक्टोबर या काळात सरासरीच्या तुलनेत तब्बल १३९.३ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस २०.७ टक्क्यांनी अधिक आहे. मे महिन्यातील पावसाचा विचार केल्यास यंदा सहा महिन्यांत विभागात १५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.