Marathwad : अंबाजोगाईतील ऐतिहासिक बुरुजावर झाले ध्वजवंदन

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार
marathwada news
marathwada news esakal
Updated on

अंबाजोगाई : मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त येथील ऐतिहासिक बुरुजावर बऱ्याच वर्षानंतर ध्वजवंदन करून हुतात्म्यांनी अभिवादन करण्यात आले. मराठवाडा जनता विकास परिषदेने यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्य सैनिकांच्या आकांक्षांची पूर्ती करण्याचा निर्धार करावा असे आवाहन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी यावेळी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त येथील ऐतिहासिक शहा बुरुजावर प्रथमच मराठवाडा जनता विकास परिषदेचे स्थानिक अध्यक्ष डॉ .नरेंद्र काळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके, संजय सिरसाट, नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, मुख्याधिकारी डॉ. अशोक साबळे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय महानंदा बुरांडे, प्रतिभा ठाकूर, डॉ. दिलीप खेडगीकर, डॉ. रत्नाकर काळेगावकर, व्यंकट पवार, पंडितराव भोसले, श्री. महानुभाव, श्री. विडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

शाह बुरूजाची ही मराठवाडा मुक्तिसंग्रामाची आठवण आपण सर्वजण जतन करूया. त्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिले.उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमेश सोनवळकर यांनी केले. प्राचार्य डॉ. दामोधर थोरात यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी प्रकाश बोरगावकर, मुख्याध्यापक श्री. कदम, दत्ता देवकते, मनेश गोरे, राजू साळवे, संतराम कराड, जगदीश जाजू, विशाल आकाते, प्रा. सागर कुलकर्णी, भीमसेन लोमटे, गोविंद टेकाळे, रणजीत मोरे, विलास काचगुंडे, मुन्ना सोमाणी, बाळासाहेब फुलझळके, सलिम शेख, प्रा. रोहित पाटील, अतुल कसबे यांनी पुढाकार घेतला.

यावेळी शाह बुरुजाचा इतिहास दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण उपविभागीय अधिकारी शरद झाडके व राजकिशोर मोदी यांच्या हस्ते झाले. या फलकात बुरुजाचे महत्त्व व इतिहासाची माहिती दिली आहे.

असा आहे बुरुजाचा इतिहास

या बुरुजाला ऐतिहासिक महत्त्व असून यास शाही बुरूज किंवा लमाण बुरूज असेही म्हणतात. मोमीनाबाद हे अंबाजोगाईचे निजामकालीन नाव होते. या बुरुजावर ब्रिटिश शासनाने सेनाधिकाऱ्यांच्या सोयीसाठी रेडिओ बसवला होता.

जो १९४२ च्या चलेजाव चळवळीतील सत्याग्रहामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी तो पळवून नेला होता. हैद्राबादच्या निजामाच्या फौजेचा कायमचा तळ अंबाजोगाई येथे असायचा. ब्रिटिश सरकारने आपले ५०० संख्येचे घोडदळही निजामाच्या या तळावर ठेवले होते.

सध्याच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात हे ब्रिटिश दल होते. १९३९ ला दुसरे महायुद्ध चालू झाले होते. निजाम आणि ब्रिटिश दलाचे अधिकारी आणि शिपाई यांना युद्धाच्या बातम्या समजण्यासाठी आणि स्थानिक जनतेला काही सूचना किंवा घोषणा करण्यासाठी हा रेडिओ बसवण्यात आलेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com