esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Raosaheb Danve

Raosaheb Danve : सरसकट एकरी ५० हजारांची मदत त्वरित द्या

sakal_logo
By
अक्षय साबळे

जालना : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात तर हातातोंडाशी आलेली विविध पिके पाण्यात गेली असून शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजारांची मदत द्यावी, अशी मागमी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

दानवे म्हणाले, मराठवाड्यात १६ ते १८ आणि २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टी झाली. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांत पाणी साचलेले आहे. अनेकांची पिके वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी शेतजमीन खरवडून गेली आहे. बदनापूर तालुक्यातील देऊळगाव व तुपेवाडी येथील नुकसानीची काल पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांची स्थिती बिकट असून राज्य शासनाने पंचनामे न करता राज्य आपत्ती व्यवस्थापन फंडातून (एसडीआरएफ) तत्काळ सरसकट एकरी पन्नास हजारांची मदत द्यावी. केंद्र शासनाही राज्य शासनाला मदत करण्यात कोणताही दुजाभाव करणार नाही. केंद्राचे पथक पाहणी करील. केंद्राची मदत आल्यानंतर ती रक्कम राज्य शासन पुन्हा आपत्ती फंडात जमा करू शकते. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे उपस्थित होते.

loading image
go to top