मराठवाडा संधी शोधणारी नव्हे, संधी देणारी भुमी  - ओमप्रकाश शेटे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्याकडे मोठी गुणवत्ता आहे, ही भुमी फक्त संधी शोधणारी नाही तर संधी देणारी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी काढले. 'यंग इन्स्पीरेटर्स नेटवर्क' अर्थात यिनच्या तीन दिवसीय 'समर युथ समिट 2018' चे उद्‌घाटन त्यांच्या उपस्थित पार पडले. 
येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात रविवारी (ता. 10) सकाळी हा उद्‌घाटन सोहळा झाला.

औरंगाबाद : मराठवाड्याकडे मोठी गुणवत्ता आहे, ही भुमी फक्त संधी शोधणारी नाही तर संधी देणारी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी काढले. 'यंग इन्स्पीरेटर्स नेटवर्क' अर्थात यिनच्या तीन दिवसीय 'समर युथ समिट 2018' चे उद्‌घाटन त्यांच्या उपस्थित पार पडले. 
येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात रविवारी (ता. 10) सकाळी हा उद्‌घाटन सोहळा झाला.

भविष्याची दिशा मिळण्याच्या हेतुने आयोजित या समिटला औरंगाबाद, जालना, बीड येथुन आलेल्या तरुणांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यावेळी ओमप्रकाश शेटे म्हणाले, "कोणत्याही पदावर गेल्यावर आपल्या मातीचा विचार मनात कायम असायला हवा. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन हवा, प्रसंगी कायद्याची चौकट मोठी करुन घेत आपण काम केले आहे'. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख म्हणुन आपल्याला तब्ब्ल 350 कोटी सामान्यांच्या इलाजासाठी देता आल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. सुतराम शक्‍यता नसताना महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. विद्यार्थ्याला एखादा शिक्षक रागवत असे तर ते त्याला कमी लेखण्यासाठी नव्हे तर त्याला बळ देण्यासाठी, हे विद्यार्थ्यांनी ध्यानी ठेवावे, असेही त्यांनी सांगितले." 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, उद्योजक सुनिल पाटील, अविनाश चाटे, शिवाजी चौधरी, इ. डी. इरागी, सुनिल पाटील, संदीप काळे आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमाची सुरूवात श्रावणी पाटीलच्या गणेश वंदनेने झाली. स्वप्नील जोशीने सुत्रसंचलन तर तेजस गुजराथी यांनी आभार मानले.

काय म्हणाले मान्यवर.. 
अभियांत्रिकी- वैद्यकीय'ची शर्यत सोडा -

पवनीत कौर चांगले गुण मिळाले की मुलांना अभियांत्रिकी अथवा वैद्यकीय शिक्षणाकडे वळवले जाते. मुलांनी अन्य क्षेत्रांचीही निवड कारकिर्द घडवण्यासाठी करायला हवी. स्वप्न साकार करण्यापेक्षा त्याची निवड करणे जास्त अवघड काम आहे. आयटी क्षेत्रात नोकरी केल्यावर हे काम आपले नाही हे काळाले, त्यानंतर लोकसेवा आयोगाकडे जाण्याचे ठरवले. करीयर कशात करायचे यापेक्षा ते का करायचे याचे उत्तर अधी शोधा.

एकच चूक दुसऱ्यांदा नको - चिरंजीव प्रसाद 

तरुणांनी तंत्रशुद्ध विचार करायला हवा. एकदा चुक झाली तर ठीक, पण ती दुसऱ्यांदा होता कामा नये. ग्रहण करण्यासारखे काय आणि सोडुन देण्यासारखे काय याच्यातील फरक लक्षात यायला हवा. वाहन चालवताना फोन न वापरणे, रस्त्यांवर कानात हेडफोन न वापरणे यासारख्या लहान गोष्टी देश घडवतात. गैरसोयींचे रुपांतर संधीत करता आलेच पाहिजे. गावात शहरापेक्षा अधिक वेळ अभ्यासाला मिळतो, हे ध्यानी असावे.

जगाच्या ट्रेंडसह मराठवाड्याचा विचार - शिवाजी चौधरी

जगाचा ट्रेंड काय आहे आणि त्यातील मराठवाड्यात काय विकते याचा अभ्यास करुन तरुणांनी सुवर्णमध्ये काढावा. जगभरातील अनेक गोष्टी चांगल्या वाटतात पण आपल्या संस्कृतीकडे आपोआप पाऊले वळतात. मराठवाड्यातील मुलांकडे "पीक-अप सेन्स' आणि "ग्रॅबिंग कपॅसिटी' चांगली आहे. यशस्वी माणसापेक्षा अयशस्वी माणसाचा अभ्यास आपल्याला अधिक चांगली दिशा देतो, चुकांचाही अभ्यास हवा. 

भविष्य नाही, मी वर्तमान - इ. डी. इरागी 

तरुणांना कायमच देशाचे भविष्य म्हणुन संबोधले जाते. भविष्य असल्याचे सांगितल्यावर आपण थांबतो. त्यामुळे यापुढे स्वतःला भविष्य न संबोधता देशाचे वर्तमान समजा. तुम्ही नशिबवान आहोत की भारतात जन्माला आलात. भारताता ज्ञानाचे अनेक भांडार आहेत. त्यातुन ज्ञान घेण्याचे आपले कायम प्रयत्न असतात. "यिन- समर युथ समिट 2018'साठी बोलवल्याचा आपल्याला आनंद आहे.

शिक्षणाची प्राथमिकता ठरवावी - अविनाश चाटे

शालेय अभ्यासक्रमातुन बाहेर पडणाऱ्या मुलाला त्याच्या करियर बद्दल विचाकरले असता तो बारावी पुर्ण करण्याचे सांगतो, कारण त्याची ती प्राथमिकता आहे. आता पारंपारिक शिक्षण पद्धतीला छेद देत शिक्षणाची प्राथमिकता ठरवुन कारकिर्दीच्या दिशा ठरवण्याची वेळ आली आहे. गुणवत्ता आणि कौशल्यावर आधारित काम करुन "आन्तरप्रनेरशिप' विकसित करुन व्यवसाय सुरु करावेत.

Web Title: Marathwada not looking for opportunities, Opportunity Land - Om Prakash Shete