
Latest Marathawada News: निलंगा विधानसभा मतदार संघातून माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव मंत्री मंडळ विस्तारात संभाव्य मंत्री म्हणून चर्चिले जात आहे.
जेष्ठ आमदार म्हणून त्यांची वर्णी लागू शकते यासाठी निलंग्याला पुन्हा मंत्री पद मिळणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय जातीय समिकरण व लातूरला स्थानिक नेतृत्व व पालकमंत्री म्हणून ही निवड निश्चित मानली जात आहे.