Marathwada Agriculture : दुष्काळ आणि जमिनीतील ओलाव्याअभावी मराठवाड्यात रब्बी पेरणी रखडली; छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये उद्दिष्टाच्या केवळ १४.२९ टक्के पेरणी

Marathwada Rabi Sowing Affected by Drought and Low Soil Moisture : दुष्काळी परिस्थिती, जमिनीतील कमी ओलावा आणि सिंचनासाठी पाण्याची अनुपलब्धता यामुळे मराठवाड्यात रब्बी पेरणीचा वेग मंदावला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत १३ नोव्हेंबरपर्यंत उद्दिष्टाच्या केवळ १४.२९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
Marathwada Rabi Sowing Affected

Marathwada Rabi Sowing Affected

Sakal
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : यंदा दुष्काळी स्थितीचा परिणाम रब्बी हंगामावरही दिसत आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नाही, सिंचनासाठी पाण्याची उलब्धता नाही व आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला अपेक्षित वेग दिला नाही. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बी पिकांचे क्षेत्र सात लाख २७ हजार ५७५ हेक्टर असताना १३ नोव्हेंबरपर्यंत केवळ एक लाख तीन हजार ९८८ हेक्टरवर उद्दिष्टाच्या अवघी १४.२९ टक्केच पेरणी पूर्ण झाली.

Loading content, please wait...