esakal | Latur : बहरलेलं पीक डोळ्यांदेखत गेलं
sakal

बोलून बातमी शोधा

Latur : बहरलेलं पीक डोळ्यांदेखत गेलं

Latur : बहरलेलं पीक डोळ्यांदेखत गेलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : सातत्याने पडणारा पाऊस, त्यात दोन तीन दिवस सलग झालेली अतिवृष्टी, नद्यांना आलेला महापूर याचा मोठा फटका जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला बसला आहे. दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले ऊस पीकही आडवे झाले आहे. इतर खरीप पिकेदेखील डोळ्यांदेखत पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

गत हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. सप्टेंबरमध्ये सोयाबीन हाती येत असताना असताना अचानक भाव कोसळले होते. प्रतिक्विंटल ते सहा ते सात हजारांवर आले होते. त्यामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला.

सोयाबीनची मोठी पेरणी

जिल्ह्यात खरिपाचे पेरणी क्षेत्र सहा लाख १२ हजार हेक्टरचे आहे. यात चार लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जूनमध्ये पेरणी केलेल्यांचे सोयाबीन तर काढणीला आले होते. जुलैमध्ये पेरणी झालेले पीक जोमात होते. असे असतानाच गेल्या चार पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनला फटका बसला आहे. नदीकाठचे सोयाबीन वाहून गेले आहे. इतर शेतात पाणी साचून राहिल्याने सडून त्याचे नुकसान होत आहे. काढणी आलेले पीक डोळ्यांदेखत जात असल्याची पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ऊस झाला आडवा

मांजरा, तेरणा नदीकाठच्या अनेक गावात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लावला आहे. दोनही नद्यांना महापूर आला आहे. यात अनेक गावातील ऊस वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी तर तो मुळासकट उखडून बाहेर पडला आहे. धनेगाव (ता. लातूर) येथे तर एका शेतातील ऊस वाहून पुलाला अडकून बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

loading image
go to top