

Marathwada Rain Updates
esakal
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात मंगळवारी (ता. २१) दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवेत गारवाही आला होता. जोरदार सरी कोसळतील असे चित्र असताना बहुतांश भागांत पावसाने केवळ रिमझिमवर बोळवण केली. अजूनही काही भागांत पेरणीच्या टक्केवारीने शंभरी गाठलेली नाही. तुरळक पावसावर पेरलेले उगवतेय, पण त्याच्या वाढीची चिंता आहे. शिवाय जलप्रकल्पांना आधार मिळेल, असा सर्वदूर दमदार पाऊस अद्याप झालेला नाही.