Marathwada Rain Update: धाराशिव, भूम, जालन्यात जोरदार सरी; मराठवाड्याच्या अन्य भागांत तुरळक, हलका पाऊस
Heavy Rain Lashes Dharashiv and Bhoom: मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत हलका ते तुरळक पाऊस झाला असून काही भागांत ओढे-नाले वाहू लागले आणि वाहतुकीवर परिणाम झाला.
धाराशिव: धाराशिव शहर आणि परिसरासह भूम तालुक्यात सोमवारी (ता. तीन) मुसळधार पाऊस झाला. जालना शहरातही काहीकाळ जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांत तुरळक ते हलका पाऊस झाला.