Marathwada Rain: धाराशिवला मुसळधार, मराठवाड्याच्या अन्य भागांत तुरळक पाऊस; जायकवाडी ६५ टक्क्यांवर

Heavy Rain Brings Relief to Dharashiv: जायकवाडी धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला असून शेतकरी अजूनही सातत्यपूर्ण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Marathwada Rain

Marathwada Rain

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा लपंडाव सुरूच आहे. सर्वदूर जोरदार समाधानकारक आणि सातत्याची आवश्यकता असताना कुठेतरी रिमझिम किंवा मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, धाराशिव शहरात मंगळवारी (ता. २८) दुपारी मुसळधार पाऊस झाला. या हंगामातील हा पहिलाच जोरदार पाऊस होता. जिल्ह्याच्या काही भागांतही पाऊस झाला. मराठवाड्यात सुरवातीपासूनच पावसाचा लहरीपणा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com