

Marathwada Rainfall
esakal
परभणी: यंदाच्या अपुऱ्या पावसाने आधीच संकटाच्या गर्तेत ढकललेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आता परतीच्या पावसाचीही अनिश्चितता उभी ठाकली आहे. पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट असताना निदान परतीचा पाऊस तरी दिलासा देईल, या आशेवर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.