
Marathwada Rain
sakal
परभणी : मराठवाड्यात पावसाचा यंदा अक्षरशः मारा झाला. जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी तब्बल ९४९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीचा सरासरी केवळ ६७९.५ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा पावसाने सरासरी ओलांडून पुढची मजल गाठली. यंदा पावसाची टक्केवारी होती १३९.७. अनेक वर्षांच्या तुलनेत पावसाचा हा विक्रमच आहे.