Marathwada : पुढच्या पिढीच्या नशिबी दुष्काळ येऊ नये म्हणून संभाजीराव पाटील निलंगेकरांची जलसाक्षरता रॕली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाकडून तोंडभरून कौतुक
lature
lature sakal

निलंगा - पर्यावरणाच्या बदलामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ असा पावसाचा असमतोल निर्माण झाला आहे. लातूर शहराला सन २०१६ साली रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. भविष्यात पाण्याची जणजागृती व्हावी भावी पिढीला पाण्याचे महत्त्व कळावे त्यांच्या नशिबी दुष्काळ येऊ नये म्हणून माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हाती घेतलेली जलसाक्षरता मोहीम महत्वपूर्ण असल्याचे कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हाभर जलसाक्षरता रॕलीचे आयोन केले असून ही रॕली दहा तालुक्यातून जवळपास आठशे किलोमीटर प्रवास करून एक हजार तीनशे गणेश मंडळापर्यंत जाणार आहे. गावागावातील ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, गणेश मंडळ, बचतगट आदीचा मोठा पाठींबा मिळत असून

जलसाक्षरतेची मोहीम भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल जिल्ह्यामध्ये पाणी बचत व पाण्याचे महत्त्व काय हे पटवून देणे काळाची गरज आहे. त्यासाठी सत्तेतील आमदार 'निलंगेकर' यानी राज्यामध्ये आपल्या पक्षाची सत्ता असतानाही पाण्यासारख्या संवेदनाशील विषयावर जल साक्षरता रॕली सुरू केली असून भविष्यात पाण्यासाठी लातूरकरांचे हाल होणार नाहीत त्याना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून हा प्रयत्न सुरू आहे.

lature
Solapur News : तीन वेळा अपयश,नकारात्मक न होता,विद्याची जिद्दीने यशाला गवसणी

पाण्याचा समान हक्क मिळावा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना पाणी मिळावे या तत्वाप्रमाणे गोदावरी खोऱ्यात सोडण्यात येणारे पाणी बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यला मिळणार नाही. याबाबतची माहीती पटवून देण्यात येत असून प्रसंगी पाण्यावरून मराठवाड्यामध्ये जनसंघर्ष पेटून मोठे आदोलने उभे होतील म्हणून मुख्य स्तोत्रातून जिल्हानिहाय पाण्याचा वाटा ठरवावा अशी त्यांनी मागणी केली आहे. जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी जल साक्षरता रॕलीचे आभियान राबवून पाण्याचे आगळेवेगळे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.

lature
Ahmednagar : कौटुंबिक वादातून सावळीविहीरमध्ये तिहेरी हत्याकांड

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जलसाक्षरता रॕलीची दख्खल घेऊन संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून राबवण्यात येत असलेली मोहीम अतिशय प्रेरणादायी असून या कामात सातत्य असणे गरजेचे आहे.

lature
Chatrapati Sambhajinagar : नो-पार्किंगमध्ये कार,भरा दोन हजार दंड !

ही जलसाक्षरतेची मोहीम अत्यंत महत्त्वाची व प्रासंगिक असून मराठवाड्याच्या विशेष मंत्रीमंडळाच्या बैठकीत सिंचनासाठी विशेष निधीची तरतुद करण्यात आली आहे. दुष्काळ निवारण्याच्या प्रयत्नात सर्वांचाच वाटा अवश्यक आहे. एकेकाळी रेल्वेने पाणी आणण्याची वेळ लातूरकरासाठी आली होती. भविष्यात अशी वेळ भावी पिढीवरती येऊ नये यासाठी सर्वांनी सहभागी होऊन जलसाक्षरता मोहीम यशस्वी करावी असे अवाहन त्यांनी यावेळी एका व्हीडीओ क्लिपद्वारे केले आहे. आज रॕलीचा चौथा दिवस असून सध्या त्या-त्या तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com