Marathwada : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या आठवणी जागविणारे ‘स्मृतिस्थळ’

आज उद्‍घाटन स्मृतिस्तंभासह ग्रंथालय, बैठकीचे दालन, अभ्यासिकेचा समावेश
marathwada
marathwadasakal

अंबाजोगाई - मराठवाड्यात अंबाजोगाई हे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रमुख केंद्र होते. स्वामी रामानंद तीर्थ हे या लढ्याचे प्रमुख सेनानी होते. त्यांच्या व हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या आठवणी जागविण्यासाठी येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या आवारात संस्थेच्या पुढाकाराने मुक्तिसंग्रामाचे स्मृतिस्थळ येथे उभारण्यात आले आहे. आज त्याचे उद्‍घाटन होणार आहे.

या स्मृतिस्थळाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिक, हैदराबाद मुक्तिलढ्याच्या स्मृती, आठवणी जपल्या जाणार आहेत. इतिहासातील आठवणी जपल्या तरच त्या पुढील पिढ्यांना अनुभवता येतील म्हणून स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सर्व लढवय्ये यांचे स्मारक उभे करण्याचा निश्चय योगेश्वरी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे व संस्था पदाधिकाऱ्यांनी घेतला. वर्षभरापूर्वी त्याचे काम सुरू झाले आणि ते पूर्णही झाले.

स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृतिस्थळाच्या दुमजली वास्तूचे क्षेत्रफळ ५ हजार ६४० चौरस फूट आहे. या स्मृतिसथळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांच्यासह मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे अनुभव व योगदानाविषयी माहिती संकलित केली आहे.

मुक्तिलढ्यासंबंधी काही दुर्मिळ घटना, छायाचित्रे, पुस्तके, स्मरणिका, शोधनिबंध, वृत्तपत्र संग्रह, महिलांचे योगदान, हुतात्म्यांची आठवण याबरोबरच तीस फुट उंचीचा हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर २३७ हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत.

marathwada
Pune News : समाजमंदिराच्या ठिकाणी महापालिकेतर्फे होणार आरोग्य केंद्रे

स्मृतिस्थळात लढ्यातील काही दुर्मिळ साहित्य व दस्तऐवज, ग्रंथालय व स्वतंत्र बैठकीचे दालन आणि अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. स्मृतिस्थळ व हुतात्मा स्तंभाच्या सौंदर्यात भर टाकण्यामध्ये कला शिक्षक व शिल्पकार गणेश कदम यांचे मोलाचे योगदान आहे.

अंबाजोगाईच्या तत्कालीन वकील मंडळींपैकी भाऊसाहेब चौसाळकर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी एकत्र येत राष्ट्रीय शिक्षणाच्या धोरणाची प्रेरणा घेऊन १९१७ मध्ये मराठी माध्यमाचे योगेश्वरी नूतन विद्यालय सुरू केले. निजाम राजवटीचा अशा शाखेकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयित होता.

marathwada
Satara News: महापुरुषांचा सोशल मीडियावर अवमान, साताऱ्यातील पुसेसावळी येथे दंगल; हिंसक जमावाने घरे पेटवली

ही शाळा बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या प्रतिकूलतेस न जुमानता स्वामी रामानंद तीर्थ या शाळेत मुख्याध्यापक म्हणून आले आणि त्यांनी या शाळेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. येथूनच स्वामीजींनी हैदराबाद मुक्ती लढ्यात स्वतःला झोकून दिले.

त्यामुळे स्वामीजींच्या मुक्तिलढ्याच्या संघर्षाचा उगमच योगेश्वरी शिक्षण संस्थेत असताना झाला. या स्मृतिस्थळाच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन पिढ्यांना हैदराबाद मुक्ती लढा व स्वामीजींच्या आठवणी अनुभवता येणार आहेत. या स्मृतिस्थळाचे उदघाटन रविवारी (ता. १७) सकाळी १० वाजता ज्येष्ठ साहित्यीक डॉ. जनार्दन वाघमारे, इतिहासतज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव यांच्या उपस्थितीत होणार आहे.

marathwada
Marathwada : मुक्तीसाठी विश्वनाथ राजहंस यांनी पत्करले हौतात्म्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com