Marathwada : आठवड्यातून तीन दिवस हिंगोलीत हळदीचा लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada news

Marathwada : आठवड्यातून तीन दिवस हिंगोलीत हळदीचा लिलाव

हिंगोली : येथील बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात आठवड्यातून तीन दिवस हळदीची खरेदी- विक्री सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (ता. १०) दोनशे वाहनांतून जवळपास चार हजार क्विंटल हळद विक्रीस आली होती. दोन हजार क्विंटल हळदीचा लिलाव झाल्याने उर्वरित हळदीचे वजन मंगळवारी करण्यात आले.संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवार, बुधवार व शुक्रवारी हळदीची खरेदी- विक्री केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हळद विक्रीस येत आहे.

हेही वाचा: Marathwada : दसऱ्याच्या मुहूर्तासाठी बाजारपेठ सज्ज

सोमवारी हळदीची खरेदी- विक्री असल्याने रविवारपासून (ता. ९) रात्रीच अनेक शेतकऱ्यांनी वाहनांतून हळद आणली होती. त्यासाठी शेतकऱ्यांना मुक्काम ठोकावा लागला. सोमवारी दोन हजार क्विंटल हळदीचा लिलाव होऊन वजन काटे झाले. उर्वरित हळदीचा लिलाव आणि वजन काटे मंगळवारी झाले.

हेही वाचा: Marathwada : जालना जिल्ह्याचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला

संत नामदेव हळद मार्केटमध्ये मध्यंतरी जागेवरच हळदीचे ढिगारे टाकून लिलाव केल्यानंतर वजन काटे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जागेवरच ढिगारे टाकून हळदीचे वजन काटे केले जात आहेत. एकीकडे बाजार समितीने कट्टी पद्धत बंद केल्याचे सांगितले असले तरी शेतकऱ्यांच्या हळदीतून एक किलो हळदीची कट्टी होत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.