Marathwada Water Crisis: मराठवाड्यात पाणीप्रश्न पेटला! कुठे शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर रास्ता रोको, तर कुठे महिलांचे टाकीवर ‘शोले स्टाइल’ आंदोलन

Marathwada Water Crisis Farmers and Women Stage Protests: पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर, महिला टाकीवर; मराठवाड्यात दोन ठिकाणी तीव्र आंदोलने
Vaijapur Farmers Protest on Samruddhi Expressway Over Nandur Madhmeshwar Canal Water Release Hingoli Women Demand Drinking Water

Vaijapur Farmers Protest on Samruddhi Expressway Over Nandur Madhmeshwar Canal Water Release Hingoli Women Demand Drinking Water

sakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर/हिंगोली : मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. वैजापूरमध्ये नांदूर मधमेश्वर कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर शनिवारी रास्ता रोको केला. या वेळी झालेल्या झटापटीत एका शेतकऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील गोंधनखेडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी थेट पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले.

Loading content, please wait...