अंबड तालुक्यातील सुखापुरी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 19 जानेवारी रविवार रोजी दुपारी 2:30 वाजता रंभादेवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली रंभा देवी व शुक्राचार्य या दोघांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर सुखापुरी येथे जवळजवळ आहे
रंभा देवीने ऋषी शुक्राचार्यची सुखापुरी याच ठिकाणी सौंदर्याच्या मनमोहक अदानी तपश्चर्या भंग केली असल्याची आख्यायिका भाविक सांगतात. रंभादेवीच्या यातच यात्रेत जालना जिल्हासह सोलापूर, संभाजीनगर, परभणी, बीड, अहमदनगर आणि विदर्भातील अनेक मल्ल दरवर्षी कुस्त्यांची दंगल व रंभादेवीचं दर्शन घेण्यासाठी येतात