esakal | जालना शहरात गांजासह गुप्ती जप्त, तीन जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

जालना  शहरात राजस्थान येथून गांजा घेऊन येणाऱ्या कारसह तीन जणांना सदर बाजार पोलिसांनी बुधवारी (ता.२८) रात्री अटक केली आहे.

जालना शहरात गांजासह गुप्ती जप्त, तीन जणांना अटक

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : शहरात राजस्थान येथून गांजा घेऊन येणाऱ्या कारसह तीन जणांना सदर बाजार पोलिसांनी बुधवारी (ता.२८) रात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून एक किलो ९८४ ग्रॅम गांजा व एक गुप्ती, तीन मोबाईल, एक कार असा असा एकूण पाच लाख २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जालना शहरातील जवाहर बाग चौक येथे काही जण बुधवारी रात्री गांजा घेऊन येणार असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री सदर जवाहर बाग चौक येथे सापळ लावला.

तरुणांना नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी, एक हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त

संशयित कार आल्यानंतर पोलिसांना कार थांबविली व कारची झाडाझडती घेतली असता डिग्गीमध्ये एक किलो ९८४ ग्रॅम गांजा, एक धारदार गुप्ती पोलिसांनी मिळून आली. पोलिसांनी कारमधील किसन रंगनाथ धनवटे (वय २७, रा. चंदनझिरा, जालना), प्रेम किशोर पेशवानी (२९ रा. संभाजीनगर, जालना), सर्जेराव श्रावण पवार (वय ५५ रा. दीपक हॉस्पीटल पाठिमागे, जालना) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे अधिक विचारपुस केली असता हा गांजा अजमेर (राजस्थान ) येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी एक किलो ९८४ ग्रॅम गांजा, एक गुप्ती, तीन मोबाईल, कार असा एकूण पाच लाख २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, कर्मचारी दिलीप लांडगे, विजय कदम, समाधान तेलंग्रे, सुधीर वाघमारे, फुलचंद गव्हाणे, सोपन साठेवाड, योगेश पठाडे, सोपान क्षीरसारग, रमेश फुसे, अनिल काकडे, अशोक खरात यांनी केली.

संपादन - गणेश पिटेकर