esakal | औसा तालुक्यात पैशासाठी विवाहितेचा छळ; पती विरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

सततच्या मारहाणीला कंटाळून रागिणी यांनी भाऊ ज्ञानेश्वर पाटील यांना फोन करून सासरी बोलावून घेतले होते

औसा तालुक्यात पैशासाठी विवाहितेचा छळ; पती विरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
केतन ढवण

उजनी (लातूर): बोरफळ (ता. औसा) येथील एका विवाहितेचा माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केला जात असल्याने सोमवारी (ता. सहा) पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर पती विरोधात औसा पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पती किशोर यादव हे दारु पिऊन शुल्लक कारणावरुन सतत मारहाण करत असून मागील काही दिवसापासून ट्रॅक्टरची ट्रॉली घ्यायला माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत होते. त्यासाठी अनेक वेळा त्यांनी मारहाण केल्याचे पीडित महिलेने सांगितले.

सततच्या मारहाणीला कंटाळून रागिणी यांनी भाऊ ज्ञानेश्वर पाटील यांना फोन करून सासरी बोलावून घेतले. त्यावेळीही आरोपी किशोर यादव याने दोघांनाही शिवीगाळ करत लाथा व भुक्याने मारहाण केली. सोमवारी पीडित महिला तक्रार दाखल करण्यासाठी भाऊ ज्ञानेश्वर यांच्या गाडीत बसली असता पाठीमागून गाडीवर दगडफेक केली. त्यामध्ये एम एच १२ क्यूजी ७४८६ या गाडीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. याबाबत औसा पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बोरळीकर हे करत आहेत.

हेही वाचा: लातूर: अहमदपूरात पावसाची जोरदार हजेरी

याबाबत पाडोळी (ता. उस्मानाबाद) येथिल पीडित महिलेचे भाऊ ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षापूर्वी बहिण रागिनी पाटिल यांचे बोरफळ येथील किशोर शिवाजीराव यादव यांच्याशी विवाह झाला होता. तेव्हापासून तिचा विविध कारणांसाठी सासरच्या मंडळीकडून छळ केला जात होता. केवळ प्रतिष्ठेसाठी याबाबत आत्तापर्यंत तक्रार करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top