Pachod News : सुलतानपूर येथे पोलिस व चाईल्ड लाईन पथकाने अल्पवयीन मुलीचा रोखला विवाह

पोलिसांच्या समुपदेशनामुळे संतप्त वधू वर पक्षाने आपल्या चुका मान्य करत मुलगी सज्ञान होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांच्या समुपदेशनामुळे संतप्त वधू वर पक्षाने आपल्या चुका मान्य करत मुलगी सज्ञान होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांच्या समुपदेशनामुळे संतप्त वधू वर पक्षाने आपल्या चुका मान्य करत मुलगी सज्ञान होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला.Sakal

पाचोड : चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह पाचोड (ता.पैठण) पोलिस व छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या सतर्कतेमुळे रोखला गेल्याची घटना सुलतानपूर (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता. दोन) घडली. पोलिसांच्या समुपदेशनामुळे संतप्त वधू वर पक्षाने आपल्या चुका मान्य करत मुलगी सज्ञान होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

सुलतानपूर (ता. पैठण) येथे चौदा वर्ष चार महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीच्या लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली. मंडप, सजावटीसोबतच येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीसह नातेवाईकांसाठी भोजन तयार करण्यात आले. लग्नघटीका जवळ आली.

तोच जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या 'चाईल्ड लाईन हेल्पलाईन' वर सुलतानपूर येथे सदर बालविवाह पार पडणार असल्याची माहिती मिळाली. लाईल्ड लाईनचे सचिन दौड यांनी पैठणचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांना ही गोपनीय देऊन लग्न थांबविणेसाठी विनंती केली.

खात्रीशीर गोपनीय माहीती मिळताच विजय पाटील यांनी तातडीने पाचोड (ता.पैठण) पोलिसांना घटनास्थळी जाऊन प्रकरणाची खातरजमा करून कार्यवाही करण्यासंबंधी आदेशित केले. वरिष्ठांचा आदेश प्राप्त होताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शरदचंद्र रोडगे,

पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर ,जमादार रविंद्र आंबेकर, पवन चव्हाण , संतोष चव्हाण, ग्रामसेवक श्री शिंदे आदींनी सुलतानपूर गाठले. जेव्हा पोलिस तेथे पोहचले तेव्हा त्यांना विवाह सोहळा संपन्न होणार असल्याबाबतची पूर्ण खात्री व तयारी दिसून आली.

सहायक पोलीस निरिक्षक शरदचंद्र रोडगे व सहकार्यानी वधूच्या आई-वडिलाची भेट घेत त्यांना विश्वास देत त्यांचेशी चर्चा केली तेव्हा त्यांनी मुलीचा विवाह लावून देत असल्याचे मान्य केले. सदर मुलीचे वय तपासले असता तिचे वय १४ वर्ष चार महिने असल्याचे निष्पन्न झाल्याने ती अल्पवयीन असल्याबाबत आई-वडिलांच्या निदर्शनास आणून दिले.

बालविवाहामुळे मुलीच्या आयुष्याबाबत होणाऱ्या दुष्परिणामाबाबत व कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देऊन पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले. त्यामुळे आई वडील व नातेवाईकांचे मन व मत परिवर्तन झाले.

काही काळ पोलिसांना नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वधू पक्षाने भोजन, मंडप आदी बाबीवर केलेला खर्च वायाला जावून त्यांत नाहक नुकसान सहन करावे लागले. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या सदस्यांची समजूत काढून त्यांना गावी परत पाठविले.

एकंदरीत या घटनेमुळे वधू पक्षाच्या नातेवाईकांना जेवण, मंगल कार्यालय, पाणी आदी खर्चाचा निष्कारण भार सोसवत जड अंत:करणाने लग्नाचा हट्ट सोडावा लागला. संबंधीताकडून हा विवाह न करण्याबाबत चाइल्ड लाईनच्या वतीने बंधपत्र लिहून घेण्यात आले.

त्यांना लवकरच बालकल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येणार आहे. बालकल्याण संरक्षण विभाग , जिल्हा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया व अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या सर्तकता व आदेशान्वये परिसरात यापूर्वीही बाल विवाह रोखण्यात अग्रेसर व सक्तीची भूमिका घेण्यात येवून अल्पवयीन मुलीचे विवाह करणाऱ्या पालकांचे मन परिवर्तन करून सामंजस्याने बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी वधू व वर पक्षाच्या पाल्यांना बालविवाह करणे हा कायदेशीर गुन्हा असून जाणीवपूर्वक बालविवाह ठरविण्यास किंवा त्यास प्रोत्साहन देऊन लग्नसोहळा पार पाडणाऱ्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार दोन वर्ष सक्त मजुरी व दोन लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांचे लग्न करण्याचा हट्ट न धरता त्यांना उच्च शिक्षण देण्यास प्रोत्साहित करावे, ज्यामुळे भविष्यात मुली व मुले स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांचे भविष्य उज्वल होऊन समाजात त्यांची एक विशिष्ट ओळख निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com