विवाहितेची सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या

हिमायतनगरमध्ये प्रेमी युगलाची आत्महत्या
हिमायतनगरमध्ये प्रेमी युगलाची आत्महत्या
Summary

अंबाजोगाई माहेर असलेल्या पूजाचा दोन वर्षांपूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत विवाह झाला होता.

बीड : कार घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, विवाहितेने विषारी द्रव प्राशन केल्याचे उघड होऊ नये, यासाठी उत्तरीय तपासणी टाळण्यासाठी सासरच्या मंडळींनी चक्क ती कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचा बनावट अहवालही तयार केला. मात्र, माहेरच्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसून उत्तरीय तपासणी पार पडून पतीसह चौघांवर पाटोदा पोलिस ठाण्यात (Patoda Police Station) गुन्हा नोंद झाला आहे. पूजा गणेश रायकर (वय २१, रा. धनगर जवळका, ता. पाटोदा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अंबाजोगाई (Ambajogai) माहेर असलेल्या पूजाचा दोन वर्षांपूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत विवाह झाला होता. गणेश पुण्यातील (Pune) खासगी वाहतूक कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दीड वर्ष चांगले गेले.(Married Woman Committed Suicide In Patoda Block)

हिमायतनगरमध्ये प्रेमी युगलाची आत्महत्या
मराठा आरक्षणावरुन चिखल फेक, हर्षवर्धन जाधव यांची टीका

त्यानंतर तुला अजूनही मुलबाळ होत नाही, असे म्हणत पती गणेश, सासरा शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजुबाई हे सतत तिला छळू लागले. कार घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावत. सहा महिन्यांपूर्वी पूजाच्या आई-वडिलांनी एका मुलीचे लग्न करायचे बाकी आहे. पैसे आल्यास आम्ही तुम्हाला गाडीसाठी पैसे देऊ असे सासरच्यांना सांगितले. दरम्यान, एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे गणेश पूजासह गावी धनगर जवळका येथे परतला. त्यानंतर तिचा अधिकच छळ सुरु झाला. त्यामुळे असाह्य पूजाने बुधवारी (ता.१९) वडिलांना शेवटचा फोन करुन सॅनिटायझर प्राशन केले. अत्यवस्थ अवस्थेत तिला अहमदनगरला (Ahmednagar) उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (ता.२५) रात्री आठ वाजता गणेशचा मावस भाऊ नामदेव हरिभाऊ सुडके हा रुग्णवाहिका घेऊन तिथे आला. पुण्यात माझी लॅब असल्याने खासगी रुग्णालयात माझे संबंध आहेत. उपचार चांगले होती असे म्हणत त्याने पुजाला नेऊन पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. तिथे बुधवारी (ता.२६) पूजाचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com