केज - प्रसूती वेदना जाणवू लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या एका गरोदर मातेने रविवारी (ता. ०७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्त्री जातीच्या (मुलगी) गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मात्र प्रसूतीनंतर करावयाच्या प्रशासकीय प्रक्रियेत आधार कार्डावरील जन्म तारखेवरून ती महिला पंधरा वर्षीय अल्पवयीन असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.