हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांचे पार्थिव मूळगावी रवाना

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. 

शनिवारी दिल्लीहुन हवाई दलाच्या विशेष विमानाने दुपारी बारा वाजता चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवानांच्या पार्थिव आणण्यात आले. हल्ल्यामूळे सर्वांच्या मनात चिड असून या जवानाचे पार्थिव येताचा पाकिस्ताना मुर्दाबादच्या जोरदार घोषणा नागरिकांनी दिल्या. संजयसिंह राजूपत अमर रहे, नितिन राठोड अमर रहेचा जयघोष झाला. पोलिस, सीआरपीएफ आणि सीआयएसएफ जवानातर्फे ही मानवंदना देण्यात आली. 

पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार चंदक्रांत खैरे, पोलिस आयुक्‍त चिरंजीवी प्रसाद, पोलिस अधिक्षक आरती सिंह, सीआरपीएचे विशेष पोलिस महानिरिक्षक (आयजी) राजकुमारीअसिस्टंट कमांडर श्री.राव विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधारी, महापालिका आयुक्‍त विपून विनायक, कर्नल डी.के.राणा, कर्नल विभाकर त्यागी, सीआरपीएफचे कमांडार संजीव कुमार, कॅप्टप पियुश सिन्हा, डेप्युटी कमांडर ए.मन्ना,बी.के.टोपो, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय सिरसाट,आमदार अतुल सावे, आमदार इम्तिजयाज जलील, डॉ.भागवत कराड, अंबादास दानवे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

दुपारी एक वाजेच्या दरम्यान नितीन राठोड यांचे पार्थिव वाहनाव्दारे त्यांच्या मूळ गावी चोरपांगराला पाठविण्यात आले. तर दुपारी अडिच वाजता दुसरे संजयसिंह राजपूत यांचे पार्थिव हेलीकॅप्टरद्वारे रवाना झाले. अशी माहिती सीआरपीएफचे आयजी राजकुमारी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com