
NCP in Hingoli
Sakal
पंजाब नवघरे
हिंगोली : वसमत विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य,चार सरपंच ,चार टोकाई कारखान्याचे संचालक यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे.मोठा गट राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्याने हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.आगामी स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीने मोठा डाव टाकला असुन अन्य पक्षात धांदल उडाली आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा बुधवार (ता.१० ) पार पडला.