

Massive Fire Erupts at Ambad Solid Waste Management Plant
Sakal
बाबसाहेब गोंटे
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये अवैध रित्या पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने शनिवारी (ता.23) धडक कारवाई केली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण आणि तालुका पुरवठा अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून एकूण १०० लिटर अवैध डिझेल जप्त केले आहे.