लातूर : येथील खोरी गल्लीतील हॉटेल ‘गरम मसाला’ला सोमवारी (ता. १७) सकाळी भीषण आग लागली. आगीत हॉटेलमधील साहित्य, स्वयंपाक घर, वेगवेगळी यंत्रे खाक झाली. सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे..महापालिकेच्या अग्निशमन दलाने दोन तासांत आग आटोक्यात आणली. दरम्यान, हॉटेलच्या वरील मजल्यावर रहाणारे मालकाचे कुटुंब आगीपासून बचावासाठी लगतच्या इमारतीवर गेले. तेथून खाली आले..तीन मजली इमारतीत तळ व पहिल्या मजल्यावर हॉटेल आहे. वरील दोन मजल्यांवर हॉटेल मालकाचे कुटुंब राहते. आज सकाळी साडेआठच्या सुमारासास हॉटेलला आग लागली. पाहता पाहता ती वाढत गेली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सज्ज ठेवलेले महापालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. .आणखी तीन वाहने मागविण्यात आली. चार वाहनांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत हॉटेलमधील सर्व साहित्य, फर्निचर, स्वयंपाकघरातील वेगवेगळी यंत्रणा खाक झाली. इमारतीच्या काचाही फुटल्या. आग मोठी असल्याने सतर्कता म्हणून परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे..CM Devendra Fadnavis ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण नको’.कुटुंबातील सदस्य सुखरूपया हॉटेलच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर हॉटेल मालक गफार घावटी यांचे कुटुंब राहते. खालच्या मजल्यावरून आग वरच्या मजल्यावर येत असल्याचे लक्षात येताच घरातील बारा सदस्य शेजारच्या इमारतीवर गेले. तेथून उतरून खाली आले. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती गफार घावटी यांनी दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.