
ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगाव : पैठण तालुक्यातील लोहगाव ते ढोरकीन राज्य मार्गावरील मुलांनी वाडगाव फाटा येथे महाराष्ट्र दिनी भर दुपारी रखरखत्या कडक उन्हाच्या पहा-यात किसान अॅग्रो सेन्टर दुकानात वीज शाॅटसक्रीट झाल्याने भीषण आग लागून दुकानातील जवळपास दहा ते बारा लाख रूपयाचे शेकडो लिटर द्रव रूपातील पीकावर फवारणीचे अन्नद्रव्ये,किटकनाशक, तणनाशकाने भरलेल्या प्लास्टिक कॅन, बाॅटल, जळून खाक झाल्याची घटना दुपारी तीन वाजेनंतर घडली आहे.