
जालना : शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपिटीची नुकसानभरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात ७९ कोटींपैकी तब्बल ४० कोटींचा अपहार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेल्या १० ग्राम महसूल अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात निलंबित केले असून, गुरुवारी (ता. १९) पुन्हा अकरा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. एकूण २१ जण आजवर निलंबित झाले आहेत.