
छत्रपती संभाजीनगर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर संताप असून राज्यात निषेध मोर्चे, बंद पाळण्यात येत आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी नांदेड शहरात मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम आणि सोनपेठ तालुक्यात बंद पाळण्यात आला. लातूर शहरातही सकल हिंदू समाजाने मोर्चा काढून बंद पाळला. हिंगोली शहरात व्यापारी संघटनेने मूक मोर्चा काढून प्रशासनास निवेदन दिले.