Dam Water Release: परंड्यातील सीना कोळेगाव धरणातून विसर्ग; ६८ हजार क्युसेक पाणी नदीत! , गावांना सतर्कतेचा अलर्ट
Flood Management: सीना-कोळेगाव धरणातून ६८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. महापूरामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक कमी झाल्याने सोमवारी दुपारी तीन वाजता विसर्ग कमी करण्यात आला.
परंडा : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या सर्व २१ दरवाजांतून सोमवारी (ता.२९) दुपारी ६८ हजार क्युसेकने सीना नदीपात्रात विसर्ग सुरू होता.