Marathwada Rain : मराठवाडा भागात सर्वाधिक पाऊस

राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात पडला; तर सर्वांत कमी नोंद विदर्भात झाली, अशी माहिती हवामान विभागाने मंगळवारी दिली.
Marathwada Rain
Marathwada Rainsakal

पुणे : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात पडला; तर सर्वांत कमी नोंद विदर्भात झाली, अशी माहिती हवामान विभागाने मंगळवारी दिली. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी बुधवारी (ता. १०) जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट); तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे चार हवामान उपविभाग आहेत. यात कोकणात तेथील सरासरीपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. कोकणात एक जून ते नऊ जुलैदरम्यान सरासरी एक हजार १२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत एक हजार १६६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी २२१.९ मिलिमीटर पाऊस पडतो. तेथे २५९.६ मिलिमीटर पाऊस पडला, म्हणजे सरासरीच्या १७ टक्के पावसाची नोंद झाली. विदर्भात २५७.४ मिलिमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत तेथे २५१.४ मिलिमीटर पाऊस पडला. जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, वाशीम, यवतमाळ. वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

दृष्टीक्षेपात संसर्ग

पुरुष ः ४

महिला ः ११

गर्भवती ः ८

सर्वेक्षण केलेली लोकसंख्या ः ४२,७५९

अळी सर्वेक्षण केलेली घरे ः १३,००४

अळी आढळलेली घरे ः ३५४

लक्षणे

  • ताप

  • पुरळ

  • डोकेदुखी

  • सांधेदुखी

  • डोळे लाल होणे

  • स्नायूदुखी

झिका कसा पसरतो?

झिका हा विषाणू एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासांच्या मादीमुळे पसरतो. लैंगिक संबंध किंवा गर्भवतींकडून बाळाला झिकाचा संसर्ग होतो.

प्रतिबंधात्मक उपाय

  • डासोत्पत्ती टाळणे

  • डास चावू नयेत याची काळजी

  • लांब बाही असलेले शर्ट आणि लांब पँट वापरणे

  • घरापाशी पाणी साचू देऊ नका

उपचार कसे करतात?

झिकावर निश्चित उपचार नसल्याने रुग्णाला दिसणाऱ्या लक्षणांवर औषधे दिली जातात. भरपूर पाणी पिणे, पुरेशी विश्रांती आणि सात्त्विक आहार यातून रुग्ण बरे होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com