पाचोड - माजलगावहून दुचाकीने छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या दुचाकीस्वारास पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एमबीएचा द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता. पैठण) च्या बायपासवर मंगळवारी (ता. २४) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली असून सुमित सुधाकर प्रधान (वय-२२) असे ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.