
हिंगोली : येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयास भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग मंदिर, संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथे विकासकामांसाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.