
केज : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मागील तीन महिन्यांपासून गैरहजेरीमुळे विडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. दरम्यान, रुग्णांच्या तक्रारीची दखल घेऊन आमदार नमिता मुंदडा यांनी गैरहजर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली. येथे दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.