Beed Crime : गुंगीचे औषध देऊन वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

​सततचा पाठलाग अन् इन्स्टावरून जाळ्यात ओढत केला अत्याचार; बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल.
Crime
Crimesakal
Updated on

​बीड - वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या (बीएचएमएस) एका तरुणीचा सतत पाठलाग करून, तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची आणि अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याची अत्यंत धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​शेख मुस्सवीर शेख वशीम (रा. मकसूर कॉलनी, बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com